मुंबई, 14 ऑक्टोबर : हरियाणा आणि जम्मू काश्मिर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे सांगितले जात असताना आतच्या क्षणाची मोठी अपडेट समोर आहे. राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कुणत्याही क्षणी निवडणुकीची होऊ शकते घोषणा? –
महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्याआधी 288 मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये उद्यापर्यंत विधानसभा निवडणुकीची घोषणा करु शकते. दरम्यान, राज्यात पुढील 24 तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक? –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. असे असताना राज्यात आचारसंहिता लागण्यापुर्वीच महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी ही शेवटची बैठक असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक निर्णय सरकारच्यावतीने घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, राज्यात आज पुन्हा पावसाचा अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज काय?