मोराणे (धुळे), 19 फेब्रुवारी : समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, ता. जि. धुळे येथे, हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराज यांचे रायते बाबतचे धोरण, महिला विषयीची संवेदनशीलता, युद्ध नीती, सर्वधर्म समभाव, आदर्श प्रशासन इत्यादी करायची थोडक्यात ओळख प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी उपस्थितीतांना करून दिली.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एम. एस. डब्ल्यू. बी. एस. डब्ल्यू. चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी केले.
हेही वाचा : Breaking News : दीड कोटी रूपयांच्या दरोडा प्रकरणातील 2 संशयित आरोपी अटकेत, एसपींनी दिली महत्वाची माहिती