जळगाव, 30 मे : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे कॉलरा आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा परिषदचे सर्व संबंधित विभाग प्रमुख व सर्व यंत्रणा यांनी आज वाघोदा येथे संपूर्ण पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून घेतले.
प्रशासनाने केल्या उपाययोजना –
कॉलरा साथ रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत पाऊले उचलली आहेत. यामध्ये पाणी पुरवठा पाइपलाइन दुरुस्ती सुरू करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत घरोघर जाऊन रुग्णांबाबत चौकशी केली रुग्णांना ORS बद्दल माहिती देण्यात आले.
नवीन रूग्ण आढळून आला नाही –
तसेच हात धुणे, ORS तयार करणे बाबत प्रात्यक्षिके करून दाखवले. घराशेजारी परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. मागील चार दिवसापासून एकही नवीन रुग्ण या गावांमध्ये आढळून आलेला नाही तरी सर्व आरोग्य यंत्रणा यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यरत ठेवण्यात आलेले आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये औषधीसाठा मुबलक उपलब्ध करण्यात आलेला आहे. दरम्यान, आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर महत्वपुर्ण काम केले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?