मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 28 मे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अमळनेरातील रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्यासह त्याचे सहकारी यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन चोपडा भाजपच्यावतीने शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
निवेदनात काय म्हटलंय? –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, अमळनेर शहरातील रऊफ बॅन्ड पथकाचा मालक असलम अली (वय-29 रा. सराफ बाजार अमळनेर) याने चोपडा तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फसवून तिच्यासोबत गैरवर्तन करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदरच्या प्रकरणात चोपडा शहर पो. ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून ही बाब अत्यंत चिंताजनक व गंभीर आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्यात रऊफ बॅन्ड पथकाची गाडी वापरल्याचे ही निदर्शनास आले असून, वाहतूक व परीवहन विभागाचे नियमांचेही उल्लंघन करीत जिल्हाभर फिरत असते, तसेच त्याच्या या निय कृत्या, सहभागी असलेल्या त्याच्या बॅन्ड पथकातील सहकार्याचे मोबाईल ताब्यात घेवून सीडीआर काढून त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवदेनावर भाजपचे चोपडा शहाराध्यक्ष नरेंद्र पाटील, राकेश पाटील, राजू शर्मा, हरीष महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा : अमळनेरातील ‘रऊफ बँड’च्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करा; भाजपकडून जळगावचे एसपींना निवदेन