चोपडा, 1 एप्रिल : जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोपडा तालुक्यातून मोठी बातमी समर आली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेरुघाटी ते वैजापुर रोड फरिस्ट नाक्याजवळ अवैधरित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस रेहमल जेमल पावरा याच्याकडे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी पिस्टलसह जिवंत काडतुस जप्त करत आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील जिरायत पाडा, पो. मेलाने येथील रहिवासी रेहमल जेमल पावरा (वय ३३) हा विना नंबर प्लेटची होन्डा कंपनीची मोटर सायकलवरून जात असताना पोलिसांच्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी त्याला रस्त्यावरच थांबवून विचारपूस केली असता त्याच्याकडे एक बनावटी गावठी पिस्टलसह एक जिवंत काडतुस मिळून आले. 25,000/- रु किंमतीचा एक गावठी बनावटी कटटा व 1000/- रु किंमतीचे काडतुस व 50000 रुपयाची मोटारसायकल असा एकूण 76000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, संबंधित आरोपीच्या विरोधात पो.कॉ.चेतन सुरेश महाजन यांच्या फिर्यादिवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. यावरून आरोपी रेहमल जेमल पावरा यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पो. हे. कॉ. शशिकांत पारधी करत आहेत.