मुंबई, 14 मार्च : होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि सप्तरंगांचा सण असून आज राज्यात होळीनंतर दुसऱ्या दिवशी असणारं धुलीवंदन अर्थात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेते आपआपल्या कुटुंबासह धूलीवंदनाचा आनंद साजरा करत रंगात रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पत्नी अमृता फडणवीस तसेच लेक गिरीजा यांच्यासोबत रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत मोठ्या उत्साहाने रंगांची उधळण केली. तसेच राज्यातील जनतेला धूलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी कुटुंबियांच्या साथीनं धुलीवंदनाचा सण साजरा केला असून यावेळी नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी आणि समस्त शिंदे कुटुंबीयांनी मनसोक्त धुळवड साजरी केली.
दरम्यान, त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी धुलीवंदनात सहभागी झाले होते.
यासोबतच कुटुंबीयांसह धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेंभी नाक्यावर कार्यकर्त्यांसोबत देखील धुळवड साजरी केली.