नंदुरबार, 6 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती असो वा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची आज जाहीरसभा होणार आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अँड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर बायपास रोडवर आज ही सभा पार पडणार आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक व आदिवासी पाड्यातील लोकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे असे आवाहन ॲड. गोवाल पाडवी यांनी नागरिकांना केले आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावीत यांच्याविरोधात काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी निवडणुकीच्या मैदानात आहेत. डॉ. हिना गावीत यांच्या खासदारकीच्या कार्यकाळापूर्वी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तब्बल 35 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावीत विरूद्ध ॲड. गोवाल पाडवी अशी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : खान्देशात महायुती विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, कोण-कोणाविरोधात लढणार; वाचा, एका क्लिकवर