नवी दिल्ली – भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने पूर्णपणे अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे आजही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देत आहेत.
प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली अर्पण करता येईल. यासाठी आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंतिम संस्कार अधिकृत समाधीत केले गेले. डॉ. मनमोहन सिंग हे आमच्या सर्वोच्च आदराचे आणि समाधीचे पात्र आहेत. देशाच्या या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल सरकारने आदर दाखवायला हवा होता, असे राहुल गांधी म्हणाले.
माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासंदर्भातील वस्तुस्थिती
माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा वितरीत केली जावी अशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी केलेली विनंती केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृह अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला, आणि सरकार स्मारकासाठी जागा वितरीत करेल याबाबत त्यांना सांगण्यात आले. यासाठी ट्रस्ट स्थापन करून, जागा वितरीत करावी लागणार आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्या जाऊ शकतात, असे केंद्र सरकारने काल आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं.