• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा बांधकाम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा बांधकाम

चाळीसगाव, 6 ऑक्टोबर : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व जलसंधारणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीत महिला, बालिका पंचायत तसेच ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून “वनराई बंधारा” बांधकामाचे कार्य उत्साहात पार पडले.

सीईओ मिनल करनवाल यांच्यातर्फे सत्कार –

जळगाव जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यास चाळीसगाव तालुक्यातून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह बोरखेडा येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विशेष आमंत्रित करून सत्कार केला.

बोरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील बोरखेडा शिवारातील कोल्हया नाल्यावर 5 ऑक्टोबर 2025 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला. या कार्यात सरपंच वंदना गुलाब पाटील, उपसरपंच मोहिनी संदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव नाना पाटील, पोलीस पाटील शरद धर्मा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सविता पांडे, अंगणवाडी सेविका कलाताई निकम, आशा सेविका चंद्रकला सोनवणे, महिला बचतगट सी.आर.पी. सौ. अनिता चव्हाण यांच्यासह महिला बचतगटातील सर्व महिला, युवक मंडळ सदस्य व ग्रामस्थ यांनी एकजुटीने श्रमदान केले.


ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा आणि लोकसहभागातून कार्य यशस्वीरित्या पूर्ण –

या उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारण कार्याला चालना मिळून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ होणार असून भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी कोणताही शासकीय निधी न वापरता ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा आणि लोकसहभागातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. हा उपक्रम “मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

बंधारा भविष्यात गावाच्या जलसाठ्याचा ठरणार आधारस्तंभ –

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. येथे वनराई बंधाऱ्याच्या बांधकामात ग्रामस्थांनी लोकसहभागातून योगदान दिल्याने जलसंवर्धनाबाबत जनजागृती झाली आहे. गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभारलेला हा बंधारा भविष्यात गावाच्या जलसाठ्याचा आधारस्तंभ ठरणार आहे. मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत उभारलेले असे उपक्रम ग्रामीण विकास आणि स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण आहेत.

वनराई बंधाऱ्याचे फायदे –

  • वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवून मातीची धूप थांबते.
  • पावसाचे पाणी वाया न जाता भूजलसाठ्यात वाढ होते.
  • शेतीत पिकांचे दुबार उत्पादन शक्य होते.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो.
  • ग्रामीण भागातील जलस्रोत टिकवण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी वनराई बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात.

हेही वाचा : मोठी बातमी! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील यादी वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ceo minal karanwalforest damjalgaon newsmukhyamantri samriddhi panchayat raj abhiyan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page