अमळनेर, 25 जानेवारी : अमळनेर तालुक्यातील निम गावचे ग्रामसेवक यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर त्यांना अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय होतं प्रकरण –
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 30 वर्षांपासुन तक्रारदार यांचा निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत विटभट्टीचा व्यवसाय आहे. तसेच त्यांनी नियमाप्रमाणे तहसिल कार्यालय, अमळनेर यांच्या नावे 6,000/-रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा त्यांना निम गावाचे ग्रामसेवक यांनी निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगितले होते.
तसेच निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 27 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी थेट एसीबीकडे तक्रार केली. यानंतर एसीबीने सापळा रचत लाचखोर ग्रामसेवक यांना 25 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही कारवाई 23 जानेवारीला सोमवारी करण्यात आली. तसेच याप्रकरणी ग्रामसेवकावर मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – पाचोरा तालुक्यात 7 क्विंटल कापसाची चोरी, पोलिसांची धडक कारवाई, आरोपीला अटक; वाचा सविस्तर..
दरम्यान, राजेंद्र पाटील यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांना अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस. बी.गायधनी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी दिली.
पोलिसांचे आवाहन –
नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो विभागाकडे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो विभागाने केले आहे. तसेच यासाठी 0257-2235477 या दुरध्वनी क्रमांकावर तसेच 1064 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकतात, असे सांगितले आहे.
यांच्या पथकाने केली होती कारवाई –
पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, PI संजोग बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ ,पो. कॉ. सचिन चाटे, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. जनार्धन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. प्रणेश ठाकुर, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, आदींनी केली.