मुंबई, 28 जुलै : राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राधाकृष्णन याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. यानंतर त्यांची आता महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आलीय.
कोण आहेत सीपी राधाकृष्णन? –
सीपी राधाकृष्णन यांनी1978 मध्ये त्यांनी मदुराई विद्यापीठामधून बीबीएचे शिक्षण घेतले. तसेच राज्यशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडी देखील केली आहे. सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले आहेत. राधाकृष्णन हे लहान वयातच भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी ते फक्त साडेसतरा वर्षांचे होते.
दोन वेळा लोकसभेचे खासदार –
सीपी राधाकृष्णन हे देखील 1998 आणि 1999 असे दोन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर या लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.
राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या –
- सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
- चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती
- सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.