• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Video | सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची घेतली शपथ, पहा व्हिडिओ…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Video | सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची घेतली शपथ, पहा व्हिडिओ…

मुंबई, 12 सप्टेंबर : सी.पी.राधाकृष्णन आज 12 सप्टेंबर रोजी सकाळी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर, 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव करून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


‘अशी’ पार पडली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक –

सीपी राधाकृष्णन यांची देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली असून उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले आणि त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तसेच त्यांचे विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. दरम्यान, राधाकृष्णन यांनी ही निवडणूक 152 मतांच्या फरकाने जिंकली.

महाराष्ट्र राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यकारभार आचार्य देवव्रत देवव्रत यांच्याकडे –

उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने काल गुरूवार 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असून देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील.

हेही वाचा : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: cp radhakrishnanmarathi newsNew Delhioath ceremonypresident housesuvarna khandesh livevice president

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page