• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आज पाचोऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित होते.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश, पाचोरा
नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना

ईसा तडवी, प्रतिनिधी –
पाचोरा, 12 सप्टेंबर : नारपार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्यसरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गिरणा खोऱ्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. निम्न पाडळसे प्रकल्पाच्या कामास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ते पाचोऱ्यातील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार –
अजित पवार म्हणाले की, आम्ही कुठेही गेलो तर विकासचं बोलतो मात्र काही जण येतात. बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का. मी पण वाभाडे बाहेर काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर लगावला. टीका करून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचे भले होणार नाही, असेही ते म्हणाले.

शासन आपल्या दारी –
नागरिकांचे प्रश्न जागेवर सुटावेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा साधणारा हा उपक्रम आहे. शासन आपले आहे‌ ही भावना जनतेत निर्माण करण्याचे काम केले जात आहे‌ . महाराष्ट्रातील सर्वाधिक ठिंबक सिंचन वापर करणारा जळगाव जिल्हा आहे.

निधी कमी पडू देणार नाही –
नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा केळी व कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही.

शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय –
राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने रस्त्यांची कामे करणे सहज शक्य झाले आहे. केळी पिकांचा समावेश मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याचा तसेच जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawareknath shindekishor appa patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

May 15, 2026
महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

May 15, 2026
सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page