नवी दिल्ली : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पुढील हंगाम सुरू होत आहे. यासाठी आता फक्त एक आठवडा शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने (DC) आपल्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. यामध्ये के एल राहुलऐवजी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये अक्षर पटेल हा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे.
अक्षर पटेलने गेल्या आयपीएल हंगामात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले होते. त्यानंतर दिल्लीला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी20 कर्णधार म्हणून अक्षरने 36.40 च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा आहे. त्याने गेल्या वर्षी आरसीबीविरुद्ध ही धावसंख्या केली होती. टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अक्षरने 29.07 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आहेत.
तर दुसरीकडे आयपीएल 2025 च्या लिलावात के एल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु फ्रेंचायझीने अक्षर पटेलला प्राधान्य दिले. अक्षरने टी-20 क्रिकेटमधील एकूण 16 टी-20 सामन्यांमध्ये बडोद्याचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 10 संघाने जिंकले आहेत.
कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अक्षर पटेल म्हणाला, ‘दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी टीम ऑनर आणि सपोर्ट स्टाफचा खूप आभारी आहे. दिल्ली कॅपिटल्समधील माझ्या कार्यकाळात मी एक क्रिकेटर आणि एक व्यक्ती म्हणून वाढलो आहे. या संघाचे नेतृत्व करण्यासाठी मला तयार आणि आत्मविश्वास वाटतो.
दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ: अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डु प्लेसिस, मुश्कन कुमार, मुष्कन कुमार, मुश्कन, डी , डोनोव्हन फरेरा, अजय मंडल, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी.