मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 13 जुलै : आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे यांच्या नेतृत्वात 15 जुलै 2024, सोमवार रोजी स. 11 वाजता अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य बिऱ्हाड मोर्चास व बेमुदत ठिय्या आंदोलनास धाडस सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शरद तायडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी त्यांच्या धाडस संघटनेचा पाठींबा जाहीर केला आहे. याप्रसंगी धाडस संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे, युवाध्यक्ष चंदन कोळी, कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, जिल्हासचिव चंद्रशेखर कोळी, मानसिंग सोनवणे, किरण भावसार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण कोळी, उपतालुकाध्यक्ष एकनाथ सैंदाणे (जळगाव), मोहन सपकाळे, गजानन कोळी (यावल), किरण कोळी (धरणगाव), सोपान देवराज (चोपडा), दिपक सोनवणे (भुसावळ), एडव्होकेट विनोद सोनवणे (जामनेर), किशोर कोळी (पाचोरा), विनोद कोळी (रावेर) यांचेसह धाडस संघटनेचे शेकडों कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी टोकरेकोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. दरम्यान, अमळनेरातील 15 जुलै सोमवार रोजी होणाऱ्या आपल्या न्याय्य व हक्कांसाठीच्या बिऱ्हाड मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलनात समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धाडस सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केले आहे.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार