मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी कृषी विद्यापीठ आणि एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या.
काय म्हणाले आमदार अनुप भैय्या अग्रवाल –
यावेळी बोलताना आमदार अनूपभैय्या अग्रवाल म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण हॉस्पिटल्स असतील, इंजीनिअरींग कॉलेज असतील, आयटी हब असेल यांना आपण प्रोत्साहन देतो, जास्तीत जास्त संख्येने आपण या तयार करतो आहोत, त्याचप्रमाणे माझी शासनाला विनंती आहे की, कृषी विद्यापीठ याचाही आपण विचार करावा, ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो, जे बळीराजा आहेत. यांच्याही कृषीमध्ये, चांगल्या सुधारणा व्हाव्यात, यासाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती व्हावी, अशी मागणी आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात 20 ते 25 वर्षांपासून कृषी विद्यापीठाची मागणी आहे. त्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या. डॉ. एस. वाय. पी. थोरात व डॉ. व्यंकटेश वर्लु या दोन समित्या त्याठिकाणी नेमण्यात आल्या होत्या आणि धुळ्यात कृषी विद्यापीठ हे झालं पाहिजे, असा दोनही समित्यांचा अहवाल आलेला आहे. त्यामुळे यासाठी थोडी तरतूद आपल्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी केली.
धुळ्यातील एमआयडीसीचा मुद्दा –
पुढे ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघाची मोठी समस्या आहे, माझा मतदासंघ 7 राष्ट्रीय महामार्गांना जोडून आहे. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघात मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासारखा मोठ्या 18 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याला पंतप्रधानांच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी आली आणि पैशांची तरतूदही या अर्थसंकल्पात झाली. परंतु त्याठिकाणी एमआयडीसी असूनही जागा नाही. त्याठिकाणी फार्मिंग सोसायट्यांना जे सर्वांनी शर्तभंग केलेल्या आहेत, अशा लोकांना त्या सोसायट्यांच्या जागा देऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या शर्तभंग झालेल्या लोकांच्या सर्व सोसायट्यांची जप्ती व्हावी आणि ती जागा एमआयडीसीला मिळावी, यासाठी अर्थसंकल्पात थोडी तरतूद व्हावी, अशी महत्त्वाची मागणी आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी सरकारकडे यावेळी केली.
हेही वाचा – ‘माझी अजितदादांना हात जोडून विनंती….’ खान्देशातील आमदार आमश्या पाडवींनी काय मागण्या केल्या?