• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 6, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 6 नोव्हेंबर: एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाच्या विविध योजनांतर्गत सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सवलतीच्या तिकिटासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची (NCMC) सक्ती ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. मात्र, १ जानेवारी २०२७ पासून ही अट पुन्हा लागू होणार आहे.

कार्ड सक्तीच्या अंमलबजावणीत अडचणी –

एसटी महामंडळाने १ ऑक्टोबरपासून महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसह पात्र प्रवाशांसाठी सवलतीच्या तिकिटाकरिता NCMC कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, कार्ड नोंदणी, सक्रिय करणे आणि प्रत्यक्ष वापर करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत योजनेची पुरेशी माहिती न पोहोचल्याने अनेक पात्र महिलांना कार्ड मिळवता आलेले नाही. त्यामुळे सवलतीच्या प्रवासात अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर महामंडळाने कार्डची सक्ती तूर्तास शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या उत्पन्नातही घट –

एनसीएमसी कार्डची सक्ती लागू झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या दैनंदिन उत्पन्नात घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात महामंडळाला दररोज सरासरी ३३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न घटून सुमारे २८ कोटी रुपयांवर आले. म्हणजेच दररोजच्या उत्पन्नात जवळपास पाच कोटी रुपयांची घट झाली. मात्र, या घसरणीमागे एनसीएमसी कार्डची सक्ती हेच एकमेव कारण असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. तरीही कार्डच्या अंमलबजावणीतील अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय आणि महसुलावर होणाऱ्या परिणामाचा मुद्दा चर्चेत आला होता.

ग्रामीण भागात नोंदणीसाठी विशेष शिबिरे –

राज्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांनी अद्याप एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेण्यावर भर देण्यात येणार आहे. सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या प्रवाशांपैकी सुमारे ७१ टक्के जणांना कार्ड वितरित करण्यात आले होते. अमृत ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण ७८ टक्के, तर महिला प्रवाशांमध्ये ६९ टक्के होते.

१.१० कोटी कार्डांची नोंदणी व वितरण –

आतापर्यंत राज्यात सुमारे १.१० कोटी एनसीएमसी कार्डांची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे. मात्र, पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अद्याप अनेक प्रवाशांना कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पात्र प्रवाशांची १०० टक्के नोंदणी करून कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

शासनाकडून विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतींच्या वितरणात पारदर्शकता आणणे आणि लाभार्थ्यांची अचूक नोंद ठेवणे, हा एनसीएमसी कार्ड योजनेमागील मुख्य उद्देश आहे. मात्र, नोंदणी आणि कार्ड वितरणातील अडचणी लक्षात घेता महामंडळाने प्रवाशांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्ड नसतानाही पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsMSRTCncmc cardpratrap sirnaikST buses

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 6, 2026
शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

November 5, 2026
ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

November 4, 2026
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

November 4, 2026
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

November 4, 2026
“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

November 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page