ईसा तडवी, प्रतिनिधी
जळगाव 18 फेब्रुवारी : रुग्णांच्या न्याय व हक्कांचे संरक्षण करणारी तसेच रुग्ण हितार्थ तसेच रुग्ण सेवार्थ कार्य करणाऱ्या रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांची एक मताने नियुक्ती करण्यात आली आहे.
मी संघटनेशी नेहमी प्रमाणिकपणे रुग्णांना मदत देऊन त्यांच्या हक्क अधिकाऱ्यांचे रक्षणाकरिता कार्य करीत संघटनेशी लोकांना जोडण्यात येईल व त्यांचे हक्कांसाठी लढा उभारण्यात येईल, असे समितीचे नुतन जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी म्हटले आहे. डॉ शरीफ जळगाव मेहरून येथील बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष, बी. वी न्युज २४ चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच त्यांना मिळालेले असून भारतीय पत्रकार संघाचे सचिव .अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशनचे नॉर्थ इंडिया सेक्रेटरी, पोलीस मित्र संघटनाचे महाराष्ट्र समन्वयक, आदी पदांवर ते आहेत.
बागवान यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय मोलाना आजाद आदर्श समाज सेवक पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ इंडियाचे पोलिओ डिस्ट्रिक्ट अवॉर्ड, आदी पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी अखिल भातीय जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि अन्याय अत्याचार भ्रष्टचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष आहे.
नवीन नियुक्ती व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटरपद मिळाल्याने सर्व स्तरातील मित्र खलील सुर्वे, सुधीर माने, प्रकाश पाटील, आबिद अली सय्यद फरान शरीफ डॉ संदीप सपकाळे, डॉ अतुल पाटील, एडवोकेट भूषण सूर्यवंशी, एडवोकेट योगेश वाणी, अजहर खान, नाझीम निसार, अश्फाक अलीम, अमीन निसार, समीर सलीम, मित्र – परिवारातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा : जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य; 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन