सिन्नर, (नाशिक) : सिन्नर तालुक्याचा शैक्षणिक आलेख सर्व संघटनांच्या सहकार्याने उंचावणार असा विश्वास नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल यांनी व्यक्त केला. पंचायत समिती, शिक्षण विभाग सिन्नर येथे नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल यांचा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, गणित-विज्ञान शिक्षक संघ, क्रीडा संघटना यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पंचायत समिती येथील सभागृहात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल यांचा सत्कार समारंभ तालुक्यातील विविध संघटनांनी आयोजित केला होता. याप्रसंगी प्रभारी गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे यांनी मागील सहा वर्षांमध्ये शिक्षण विभागाने विज्ञान प्रदर्शन आयोजन, इयत्ता दहावी- बारावी परीक्षांचे नियोजन, शिष्यवृत्ती परीक्षा, यु-डायस माहिती, इन्स्पारावर नोंदणी, शाळा तपासणी यासोबतच विविध शैक्षणिक विभागांमध्ये सिन्नर तालुका अग्रेसर असल्याचे सांगितले.
गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल यांनी उरलेल्या शैक्षणिक वर्षाच्या कमी कालावधीमध्ये विज्ञान प्रदर्शन, विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन, दहावी बारावी परीक्षांचे नियोजन, शाळांची वार्षिक तपासणी, विविध माहितींचे संकलन सोबतच इतर प्रशासकीय कामांचे नियोजन करून प्राथमिक व माध्यमिक संघटनांना सोबत घेऊन तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.बी देशमुख यांनी मंजुषा साळुंखे यांच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याचा शैक्षणिक विकास झाल्याचे गौरव उदगार काढले. त्याचबरोबर येणाऱ्या काळात सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान- गणित अध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, सिन्नर तालुका क्रीडा संघटना तसेच संस्थाचालक सदैव आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जी.पगार यांनी केले. सूत्रसंचालन आर.टी.गिरी यांनी केले तर आर.आर.महात्मे यांनी आभार मानले. याप्रसंगी विस्तार अधिकारी श्रीमती मंजुषा साळुंखे, श्री.सांगळे साहेब, आर.बी. एरंडे,आर.ई.लोंढे, सोनवणे एस.जी.,जाधव डी.के., चव्हाण बी.आर., सैय्यद. जे.जी., वरखेडे जी.आर., संस्थाचालक काझी एस. एस.,सैय्यद एस.एन., खतीब एस.जे.,शेख टी.एस. आदी उपस्थित होते.