जळगाव, 8 डिसेंबर : राज्यात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक वर्ष सोबत काम केले. आमच्यात तात्विक मतभेत आहेत. तर दूर झाले तर आमच्यात अधिक जवळचे संबंध येऊ शकतात, असे खडसे म्हणाले. आजही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत. माझे व्यक्तिगत बोलणे देखील होते, असेही खडसे म्हणाले.
कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
राजकारणात भूमिका बदलाव्या लागतात –
एकनाथराव खडसे पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र काम केलेले आहे. करत आलेलो आणि करतोय. आमच्यात तात्विक मतभेद आहेत. ते जर मिटले तर एकमेकांशी अधिक जवळचे संबंध येऊ शकतात. आमच्यात काही भारत विरूद्ध पाकिस्तान असं युद्ध थोडी झालंय. दरम्यान, राजकारणात तुम्हाला भूमिका बदलव्याच लागतात आणि स्विकाराव्याच लागतात, असे एकनाथराव खडसे म्हणाले.
View this post on Instagram
गुलाबराव देवकर यांच्याबाबत खडसे काय म्हणाले? –
गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना खडसे म्हणाले की, गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय, ही त्यांची व्यक्तीगत भूमिका आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता, कदाचित त्यांना असं वाटत असेल की सत्तेत जाणे हे जास्त सोयीचे ठरेल. कारण, त्यांच्या मेडिकल कॉलेज वैगेरे अनेक संस्था आहेत. त्यामुळे त्यांना काही त्रास होऊ नये, अशी त्यांची भूमिका असू शकते.
हेही वाचा : Video : खान्देशातील ‘या’ आमदाराने घेतली अहिराणीतून शपथ; पाहा व्हिडिओ…