जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा येथील शिंदे गटाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुववस्थेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी उपसरपंच यांच्या हत्येच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यामधील राजकीय वातावणरही ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरुन आता शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांनी पोलीस तसेच सरकारवर जोरदार निशाणा साधला.
एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर बोलताना म्हटले की, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचाची याठिकाणी निर्घृण हत्या झाली. या राज्यात सरपंचाच्या हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. धरणगावमध्ये एक मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आणि त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षेविषयी या जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. राज्यात निर्माण झालेले आहेत.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेला आता तीन आठवडे होऊनही यातील गुन्हेगार हा पोलिसांना सापडला नाही. यावरुनही एकनाथ खडसेंनी यावेळी निशाणा साधत म्हटले की, हेतूपुरस्कर पोलीस खाते याप्रकरणी हलगर्जी करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार, असा सवालही एकनाथ खडसेंनी केला. तसेच जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था ही बिघडलेली असून पोलिसांचा, यंत्रणेचा धाक आता राहिलेला नाही, असं चित्र असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
माजी उपसरपंच युवराज कोळी हत्या प्रकरण –
कानसवाडा गावाचे माजी उपसरंपच युवराज कोळी यांची ग्रामंपचायत कामाच्या जुन्या वादातून 21 मार्च रोजी सकाळी हत्या करण्यात आली. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करत यातील देवेंद्र पाटील या आरोपीला अटक केली. यानंतर काल परेश उर्फ सोन्या भरत पाटील आणि देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील या दोन्ही भावांना अटक केली. या दोघांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी भरत भास्कर पाटील याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा – “दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचे मला दोन फोन….मी सांगितलं की, तुमच्या मुलाला…” नारायण राणेंचा मोठा दावा
हेही वाचा – हेही वाचा : अजितदादा-जयंत पाटील यांच्यात भेट, संजय राऊतांची टीका, म्हणाले की, “गद्दारांशी…”