• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

11 नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण; मुख्यमंत्र्यांचा नव्या वर्षातील गडचिरोलीतील पहिल्याच दौऱ्यात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 1, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
11 नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण; मुख्यमंत्र्यांचा नव्या वर्षातील गडचिरोलीतील पहिल्याच दौऱ्यात नेमकं काय घडलं?

गडचिरोली, 1 जानेवारी : राज्याचे महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 1 जानेवारी रोजी अर्थात नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन विविध कार्यक्रमात भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 11 वा.च्या सुमारास आगमन झाले. तेथे त्यांचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्वागत केल्यानंतर तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला गेले. तेथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. तसेच त्यांनी गडचिरोलीमधील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनेकांशी हस्तांदोलन केले. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात व्यक्त केला.

नेमकं काय घडलं? –
मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात 1 डीकेएसझेडसीएम, 3 डीव्हीसीएम, 2 एसीएम व 4 दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 86 लाख 5 हजार रुपयांचे बक्षीस होते. दरम्यान, या सर्वांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकासकामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाहीये.

यांनी केले आत्मसर्पण –

  • विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा,
  • सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी,
  • कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी,
  • अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश,
  • राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी,
  • वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला,
  • निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली,
  • श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना,
  • शशिकला पतीराम धुर्वे,
  • सोनी सुक्कू मट्टामी राही,
  • आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : ‘…अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका!’ बडतर्फ चंदु चव्हाण या जवानाचे कुटुंबासोबत मंत्रालयासमोर आंदोलन

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdevendra fadnavis gadchiroli visitgadchiroli newsmarathi newsnaxalitesnaxalites surrender in gadchirolisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page