• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 9 ऑक्टोबर : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असून स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो. त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित ट्राय सायकल वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छता मोहिमेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन चाकी सायकलिंगचे वितरण करण्यात येत आहे. या ई-बाइक सायकलींच्या वापरामुळे गावातील स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविता येणार आहे. या सायकलींमुळे कमी खर्चात व सोप्या देखभालीत उत्तम प्रकारे गावातील स्वच्छता करता येणार आहे.

वाटप करण्यात येत असलेल्या सायकलीमध्ये ओला आणि सुका कचरा साठविण्यासाठी दोन कप्पे करण्यात आलेले असल्याने कचरा संकलनासोबतच कचऱ्याचे विलिनीकरण करणे देखील सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेंतर्गत अलीकडेच मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांची भरती करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील ग्रामसेवकांची कमतरता देखील दूर झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी ग्रामस्थांच्या सोबतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता असून या कामासाठी सर्वानी योगदान देण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे ट्राय सायकल वाटप
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे ट्राय सायकल वाटप

खासदार स्मिता वाघ काय म्हणाल्या? –
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागात बरेचवेळा कचऱ्याच्या संकलनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असते.त्यामुळे ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रामपंचायतीना उत्पन्न मिळू शकते.त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीना अशा प्रकारच्या घंटा गाड्या उपलब्ध करून देणे महत्वाचे ठरणार आहे.असेही खासदार वाघ यावेळी म्हणाल्या.

ग्रामपंचायतीनी विशेष लक्ष देण्याची गरज –
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री.अंकित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून अनेक वस्तूंची निर्मिती होऊ शकते. या बाबींकडे ग्रामपंचायतीनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कचऱ्याचे संकलन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .त्या दृष्टीने ग्रामपंचायतीनी पाऊले उचलून कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे आवाहन श्री.अंकित यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी केले. तर आभार कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती –
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, अनिल भदाणे, आदी यावेळी उपस्थित होते.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महा मुंबई मेट्रोच्या MD Rubal Agarwal यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsjalgaon zpminister gulabrao patilsuvarna khandesh livezp jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

December 17, 2025
Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page