• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ई-पीक पाहणीसाठी जिल्हा प्रशासनाने दिली मुदतवाढ

शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीक पाहणी करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 7, 2023
in जळगाव जिल्हा
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ई-पीक पाहणीसाठी जिल्हा प्रशासनाने दिली मुदतवाढ

जळगाव, 7 सप्टेंबर : राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली जात असून पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदविला नाही त्यांच्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ दिली आहे.

आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांची पीक पाहणी –
जळगाव जिल्ह्यात 6 लाख 96 हजार 618 खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप 2 लाख 2 हजार 710 म्हणजे 32.27 टक्के शेतकऱ्यांनीच पीकपेरा नोंदवलेला आहे. अद्याप 67.73 टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-पीक पाहणी करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे ‌.

पीकपेऱ्यासाठी मुदतवाढ –
शेतकऱ्यांना ‘आपल्या शेतात पीक पाहणी’ या मोबाईल पद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.

शेतकऱ्यांना येत होत्या अडचणी –
पीक शेतात आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे असते. पण ही पाहणी करताना ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असणे, अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नसल्याच्या तक्रारी प्रशासनानाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची संधी मिळणार आहे.

विविध योजनांचा लाभ –
यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे. आता विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करताना नोंदवले आहे. त्यांना पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक बिमा,पीक कर्ज,शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmerfarmers newsई-पीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

May 15, 2026
महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

May 15, 2026
सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page