अकोला, 22 फेब्रुवारी : राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून काल बारावीचा पहिला पेपर पार पडला. दरम्यान, बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली असताना अकोला जिल्ह्यातून बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परिक्षेदरम्यान काल इंग्रजीच्या पेपरच्यावेळी बहिणीला कॉपी देण्यासाठी एकाने वेगळीच शक्कल लढवली.
चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने बहिणाला कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचे सल्यूट करतानाच बिंग फुटले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी कॉपीची एकही केस झाली नाही. पोलिस बंदोबस्त आणि बैठे पथकामुळे कॉपी करणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : हजारो शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून, काय आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या?