ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 20 एप्रिल : सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत काल 19 एप्रिल रोजी ‘शाळा पूर्व तयारी’ पहिला मेळावा घेण्यात आला. शाळा पूर्व तयारी मेळाव्यात पहिली शाळेचे उद्घाटन निर्मलाताई भिकन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिलीचे नवीन विद्यार्थी यांची नाव नोंदणी, वजन उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषा विकास व भावात्मक विकास, गणन पूर्वतयारी साहित्य वाटप व पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्ष अशोक तडवी व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, राजेंद्र विसपुते, नितीन साळुंखे, श्रीराम वानखेडे, सुरेश कदम, विनोद मालपुरे, रमेश पाटील, साधना तायडे, समाधान गोळाईत, जयश्री निकम, तसेच यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : सुट्ट्या लागल्या रे! राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, जाणून घ्या सविस्तर