ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध झाल्या असून, त्यांचे लोकार्पण पाचोरा बसस्थानक येथे युवा नेते तथा नगरपालिकेचे गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज 2 सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आले.
पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या नवीन बसेस उपलब्ध झाल्याने प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. अधिक बससेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, लोकार्पण प्रसंगी बस डेपोचे डीएम मनोज भोई, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, सुमित सावंत, सतीश आबा चेडे, किशोर पाटील, अमृत पाटील, रेहमान तडवी, सलीम शेख यांच्यासह बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांच्या पाठपुराव्याला यश –
पाचोरा मतदारसंघातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, नवीन बससेवेमुळे पाचोरा शहर व परिसरातील प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा फायदा होणार असून, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा: सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






