पाचोरा, 22 ऑगस्ट : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासोबत जुळवून घेतले असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. या चर्चेवर दिलीप वाघ यांनी आज स्पष्ठीकरण दिले. आमदार किशोर पाटील यांच्यासोबत 2014 ते 2019 पर्यंत माझा काहीही संबंध आला नाही. मात्र, 2019 साली ज्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी आघाड्या केल्या, त्यानुसार आम्ही संपर्कात आलो. परंतु ज्या माणसाने माझ्यावर आघात केला आहे, त्याच्याशी तडजोड करण्याचा विषयच येत नाही, असे दिलीप वाघ म्हणाले. पाचोरा येथे त्यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलते.
काय म्हणाले दिलीप वाघ? –
दिलीप वाघ पुढे म्हणाले की, शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध झाली. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. मार्केट कमिटीची तेव्हा वैशाली सुर्यवंशी यांच्यासोबत होते. आणि म्हणून मार्केट कमिटीमध्ये आमच्या तीन जागा आल्या आणि शेतकी संघात 10 जागा आल्या. तसेच जिल्हा बँकेला आपण त्यांना पाठिंबा दिला आणि दूध फेडरेशनला आपल्याला पाठिंबा मिळाला. इथपर्यंत ही तडजोड ठीक होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे तडजोडीचे राजकारण आम्ही कधीही केले नाही आणि भविष्यात कधीही करणार नाही.
दिलीप वाघ पुढे म्हणाले की, मतदारसंघात अशीही चर्चा सुरू करून दिली की, नगराध्यक्ष पद दिलीप भाऊंना दिले जाणार असून भाऊ आम्हाला आमदारकीला पाठिंबा देणार आहेत, असे किशोर पाटील म्हणतात. तर दुसरकीडे वैशालीताई म्हणतात की, ताई तुम्ही पुढे व्हा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. मात्र, असे असताना आम्ही काय केले पाहिजे. खरंतर, गेल्या 60 वर्षांपासून वाघ परिवाराकडून मतदारसंघाची अविरतपणे सेवा केली जात आहे. वेगवेगळ्या पदांवर आम्ही निवडून आलो.
मतदारसंघात वारसावरूनच भांडणे सुरू –
आमदार म्हणतात की, आर ओ तात्यांनी मला राजकीय वारस करून गेलेले आहेत आणि वैशालीताईंना निर्मल सीड्ससाठी वारस ठेवलंय. तर दुसरीकडे वैशालीताई म्हणतात किशोर आप्पांनी अजिबात आर ओ तात्यांचा फोटो लावू नये, कारण ते माझे वडील आहेत. आप्पा म्हणतात की, तात्यांनी मला वारस केले आणि ताई म्हणतात की, मी खरी वारसदार आहे. खरंतर, मतदारसंघात वारसावरूनच यांची भांडणे सुरू आहेत. असे असताना आम्ही वाघ कुटुंबीय सगळे वारस याठिकाणी बसलो आहोत. तसेच गेल्या 60 वर्षांपासून आम्ही या मतदारसंघाचे वारस असल्याचे दिलीप वाघ यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे म्हणतात की, आमचे पक्ष चोरला, चिन्ह चोरले. आणि वैशालीताई म्हणतात की, तसेच वैशाली सुर्यंवशी देखील म्हणतात. यापैकी एक आहे शिंदे गटात आणि एक आहे उद्धव ठाकरे गटात आम्ही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रछायाखाली असल्याचे दिलीप वाघ यांनी स्पष्ठ केले.
पक्षप्रवेशावरून तिघांना खोचक टोला –
अमोल शिंदे यांचा किशोर आप्पांना धक्का…किशोर आप्पांचा अमोल शिंदे यांना हादरा, वैशाली सुर्यवंशी यांचा किशोर आप्पांना हादरा.. मात्र, तुम्ही धक्के देत राहा ही जनता तुम्हालाच धक्का देणार आहे, अशा शब्दात मतदारसंघात तिनही पक्षात होत असलेल्या पक्षप्रवेशावरून माजी आमदार दिलीप वाघ यांनी जोरदार टोला लगावला. ही पक्षप्रवेश सोहळे कामाचे आमिष दाखवून केला जात असल्याचा आरोपही दिलीप वाघ यांनी केलाय. दरम्यान, रक्षाबंधननिमित्त मतदारसंघात इव्हेंट केले जात असल्याचीही त्यांनी टीका केलीय.
हेही वाचा : “…म्हणून मी राजकारणात सक्रिय झाले” संजय राऊतांच्या उपस्थितीत वैशाली सुर्यवंशी यांनी सांगूनच टाकलं