चंद्रपूर, 4 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे दिनांक 2 डिसेंबर रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले, या शिबिरामध्ये दीडशे पेक्षा अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून या सेवेचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये विविध सामान्य आरोग्य तपासणी सोबत मोतीबिंदू तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर इत्यादी तपासण्या करून त्यावर योग्य औषोधोपचार करण्यात आला.
महापारेषण, महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण मालकीची आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेनंतर महापारेषण हि कंपनी 2005 मध्ये अस्तित्वात आली. महाराष्ट्र राज्याच्या अखंडित विद्युत पारेषण करण्याचे काम लोकाभिमुख पद्धतीने करण्याचा नावलौकिक या कंपनीने मिळवला आहे. सामाजिक ऋण परतीच्या उद्देशाने आणि व्यवसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत महापारेषण विदर्भातील विविध 19 गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करत आहे. त्या अंतर्गत या शिबारामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध तपासण्या, मोफत औषध वाटप व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
महापारेषाणचे रोहित रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापारेषण तर्फे महेश सत्रे यांची या शिबिरासाठी विशेष उपस्थिती लाभली व त्यांनी नागरिकांना यथोचित मार्गदर्शन केले. शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांच्या चमूचे नेतृत्व डॉ. विशाल पवार यांनी केले व वाय फोर डि फौंडेशन तर्फे श्याम भोजने यांचे आयोजनात विशेष सहकार्य लाभले. तसेच या सर्व शिबिराच्या नियोजनाची जबाबदारी सीर भारत फौंडेशन तर्फे डॉ. सुवर्णा पाटील, दर्शन तलहांडे व शुभम भांगे यांनी पार पाडले.