• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, पिक विमाधारकांसाठी 523 कोटीच्या निधीस मान्यता

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 23, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, पिक विमाधारकांसाठी 523 कोटीच्या निधीस मान्यता

जळगाव, 23 जुलै : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीपातील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जिल्हयातील 4 लाख 56 हजार 128 शेतक-यांनी विमा उतरविला होता. या विमा धारक शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ( क्रीडा व युवक कल्याण ) रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषि विभागासोबत वेळोवेळी बैठका घेवून विमा कंपनीला निर्देश दिले होते. त्यानुसार, विमा कंपनीने 3 लाख 87 हजार 973 शेतकरी पात्र केले आहेत. दरम्यान, त्यासाठी ओरिएंटल इंडीया इंन्सुरंन्स कंपनीमार्फत 523 कोटी 28 लाख निधीस कंपनीकडून मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा –
आज पर्यंतचा जिल्ह्यातील सर्वाधिक पीक विमा निधी मंजुर झालेला आहे. याबाबत आजच्या कॅबीनेटच्या बैठकीत सदर रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपनीस वर्ग करण्याबाबतची मागणी केली. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मंजूर शेतकरी संख्या व त्याची रक्कम –
अमळनेर 55 हजार 824 शेतक-यांसाठी, 36 कोटी 10 लक्ष, भडगाव 23 हजार 771 शेतक-यांसाठी, 11 कोटी 84 लक्ष, भुसावळ 8 हजार 476 शेतक-यांसाठी, 7 कोटी 55 लक्ष, बोदवड 12 हजार 959 शेतक-यांसाठी, 17 कोटी 84 लक्ष, चाळीसगाव 57 हजार 589 शेतक-यांसाठी, 112 कोटी, चोपडा 31 हजार 526 शेतक-यांसाठी, 51 कोटी 21 लक्ष, धरणगाव 10 हजार 533 शेतक-यांसाठी, 47 कोटी 95 लक्ष, एरंडोल 23 हजार 676 शेतक-यांसाठी, 15 कोटी 21 लक्ष, जळगाव 12 हजार 558 शेतक-यांसाठी, 4 कोटी 90 लक्ष, जामनेर 57 हजार 964 शेतक-यांसाठी, 14 कोटी 4 लक्ष, मुक्ताईनगर 2 हजार शेतक-यांसाठी, 9 लक्ष 51 हजार, पाचोरा 46 हजार 116 शेतक-यांसाठी 93 कोटी 58 लक्ष, पारोळा 40 हजार 40 शेतक-यांसाठी, 20 कोटी 94 लक्ष, रावेर 890 शेतक-यांसाठी, 50 लक्ष 87 हजार, यावल 7 हजार 51 शेतक-यांसाठी 5 कोटी 91 लक्ष असे एकुण 3 लक्ष 87 हजार 973 शेतक-यांसाठी 523 कोटी 28 लक्ष 5 हजार 389 रुपये निधी ओरिएंटल इंन्सुरंन्स इंडीया लि. कंपनीने मंजुर केलेला आहे. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावर्षी जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीजन ऍडव्हसिटी 25 टक्के) अग्रीम हा जिल्ह्यात 82 कोटी 52 लाख वितरित झालेला आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 करिता जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 50 कोटी 11 लाख रुपये वितरीत करण्यात आलेले आहे. उत्पत्रावर आधारीत खरीप हंगाम 2023 करीता नुकतीच मंजुर झालेली 523 कोटी इतकी रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषि विभागाने सांगितले.

शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचे आवाहन –
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाममात्र एवढा ऐच्छिक विमा हप्ता असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2024 करिता याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही 31 जुलै 2024 असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या जवळच्या CSC/VLE केंद्र, बैंका येथे पीक विमा नोंदणी करता येते. आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनी मार्फत प्रती अर्ज रु 40 प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

हेही वाचा : कोकण, मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसणार, जळगावचा हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: crop insurance farmersfarmer newsjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page