मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 25 जुलै : चोपडा शहरातील वार्ड क्रमांक सात मधील बडगुजर गल्लीला लागूनच सार्वजनिक शौचालय आहे. त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्याठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली असून आजूबाजूच्या नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (अजित पवार गट) नगरपालिकेच्या मुखाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आणि तत्काळ कार्यवाही –
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला शहर अध्यक्षा स्वाती बडगुजर यांच्यासह संगीता बडगुजर गायत्री परदेशी, प्रमिला बडगुजर, बेबी बडगुजर, रत्ना भोई, अनिता भोई, दीपक भोई, राजेंद्र भोई, अरुण भोई यांनी चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, या निवेदनाची त्वरित दखल घेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी जेसीबी पाठवून साफसफाई करून कार्यवाही केली.
हेही वाचा : “….तर गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन