• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी सरकारची विशेष मोहीम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी सरकारची विशेष मोहीम

मुंबई, 10 सप्टेंबर : बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय बनसोडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार दिलीप बनकर, आमदार सुमित वानखेडे, आमदार हेमंत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विठ्ठल लंगे, आमदार उमेश यावलकर, आमदार समीर कुणावर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभाक्षेत्र निहाय समिती स्थापन केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतील, विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य सचिव प्रांतअधिकारी राहणार असून त्यांच्या समवेत समितीमध्ये महसूल, पोलीस , ग्रामविकास अधिक विभागाचे अधिकारी असतील. तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अभ्यास गटाने याबाबत आराखडा तयार करावा, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ते मोहिमेस गती देण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला असून गाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अनुषंगाने शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. शेत पाणंद रस्ते बनविताना प्रामुख्याने माती, मुरूम व खडी याचा वापर होत असल्याने त्या माध्यमातून तयार होणारे थर आणि त्यांची मजबुती याकडे लक्ष दिले जावे असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना मंत्री गोगावले म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबविली जात आहे. यातून असंख्य कामे सुरु आहेत. बळीराजा शेत व पाणंद रस्ते मोहिमेत देखील चांगली कामे करण्यात येतील. दरम्यान, राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, शेत व पाणंद रस्ते योजनेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या तंट्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.


अतिरिक्त मुख्य सचिव खारगे यांनी योजनेसाठी अभ्यास गटाने तयार केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. बैठकीमध्ये उपस्थित सदस्य आमदार यांनी चर्चेत सहभाग घेऊन बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणी व कार्यवाहीसाठी विविध मुद्दे व सूचना मांडल्या. शेत व पाणंद रस्ते नोंद करण्यास प्राधान्य देताना, रस्ते नोंद नकाशे ग्राम पंचायत स्तरावर प्रदर्शित करणे यासह मंजूर केलेले रस्ते खुले करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : Video | मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात गावोगाव सर्वांनी विकासाच्या वाटचालीत हातभार लावावा – सीईओ मिनल करनवाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: baliraja shet panand road schememarathi newsshet panand roadsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page