चोपडा, 1 फेब्रुवारी : चोपडा तालुक्यातून एसीबीने ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामसेवकावर अडावद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय संपूर्ण प्रकरण? –
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील तक्रारदार यांचे पारगांव येथे शेत असून शेतात वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे देवगांव येथील ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (३९) यांनी तक्रारदारास परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 7,500 रूपयांची लाचेची मागणी केली.
दरम्यान, लाचलुचपत पथकाने दि. 31 जानेवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता सदर ग्रामसेवक सोनवणे यांना पाच हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर अडावद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई –
जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधीक्षक सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोशी. राकेश दुसाने, एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, आदी पथकाने कारवाई केली.
हेही वाचा : Nashik Crime : पत्नीची नवऱ्याच्या संपत्तीवर नजर, हत्येचा कट रचत केले धक्कादायक कृत्य