नाशिक, 1 फेब्रुवारी : नाशिकमधून नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी बायकोनेच नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने आधी नवऱ्याला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला सर्पदंश देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महिलेसह दोघेजण अटकेत –
सुदैवाने बायकोच्या या कटातून नवरा वाचला आहे. ही घटना नाशिकच्या बोरगड परिसरात घडली आहे. सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचे नाव आहे, तर विशाल पाटील असे पीडित नवऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटीलच्या संपत्तीवर पत्नी सोनी हीचा डोळा होता. मात्र, पती तिच्या नावावर संपत्ति करत नव्हता. यामुळे तिने त्याला ठार मारण्याचा कट रचला. यासाठी तिने तिच्या दोघा साथीदारांची मदत घेत सोनी हिने आधी विशालला गोड बोलत बियर पाजली. त्याला नशा चढल्यावर त्याला सर्पदंश केल्याची धक्कादायक कृत्य केले.
दरम्यान, सोनीच्या या धक्कादायक कृत्याचा काही परिणाम झाला नसल्याने तिने त्याचा गळा आवळला. एवढेच नाही तर, दोन साथीदारांच्या मदतीने पतीचे तोंड उशिने दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण यातूनही त्याचा जीव वाचला. पत्नीच्या तावडीतून वाचलेल्या या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : घरची परिस्थिती बेताची, आयफोनची मागणी पुर्ण झाली नाही म्हणून 20 वर्षांच्या मुलाची आत्महत्या