जळगाव, 15 जून : राज्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय. अशातच राज्यातील विविध भागात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. यासोबतच येत्या काही दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागात काल शनिवार 14 जून रोजी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय.
राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस –
हवामान खाताच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला असून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक ठिकाणी केळी तसेच फळगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, काल सांयकाळी तसेच रात्री देखील विविध भागात दमदार पाऊस झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज आणि उद्या विजेच्या गडगडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.