• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 14 जून : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्यावर काळाने झडप घातली असून वीज पडून त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. मोहित जगतसिंग पाटील (वय 25 वर्ष) असे त्या अविवाहित शेतकऱ्याचे नाव असून आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित जगतसिंग पाटील हे त्यांच्या कुटुंबियांसह शेतात गेले होते. आज दिवसभर त्यांच्या शेतात मका पेरणीचे काम सुरू होते. दरम्यान, आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास आई, काका तसेच काकू यांच्यासह मोहित पाटील पेरणीचे काम करत होते. यावेळी वीजेचा कडकडाट झाला आणि त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये ते जागीच कोसळले. यानंतर त्यांना पाचोरा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आईसह कुटुंबियांचा आक्रोश –  

मोहित पाटील हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव मुलगा होता. त्याच्या पश्चात बहिण तसेच आई, वडील असा परिवार आहे. दरम्यान, मोहित पाटील हा तरूण शेतकरी शेतीव्यवसाय तसेच दुग्धपालनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत कुटुंबियांसाठी आधार होता. ऐन उमेदीच्या वयात एकुलत्या एका मुलाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईसह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मोहित पाटील या तरूण शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्यावर आज रात्री 9 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे माहिती प्राप्त झालीय.

पाचोरा तालुक्यात वादळी पावसामुळे नुकसान –

पाचोरा तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तात्काळ पंचानामे देखील केले जात आहेत. तसेच पंचानाम्याच्या अहवाल शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: khedgaon nandichelightningmarathi newspachora newssuvarna khandesh liveyoung farmer died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page