जळगाव, 28 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट भागात खूप जोरदार तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, उद्या 29 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
जळगावचा आजचा काय आहे नेमका अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात संततधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील कामे खोळंबली होती. तसेच सुर्यप्रकाशाची देखील अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतल्याने आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट –
राज्यात पावसाचा जोर ओसरलाय आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत मध्यम व जोरदर स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिलाय.
हेही वाचा : ‘आमदार, खासदार असताना काय केले?, उन्मेश पाटलांचे आंदोलन म्हणजे थोतांड’, मंत्री अनिल पाटील यांची जोरदार टीका