• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

IAS Minal Karanwal: जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा मीनल करनवाल यांनी स्विकारला पदभार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 20, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
IAS Minal Karanwal: जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा मीनल करनवाल यांनी स्विकारला पदभार

जळगाव, 20 मार्च : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आज 20 मार्च रोजी मीनल करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर मीनल करनवाल यांनी तत्काळ सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतली. तसेच पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांवर विशेष भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कोण आहेत मीनल करनवाल? –
मीनल करनवाल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षण कालावधी पुर्ण केला. यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार येथे सेवा बजावली. यानंतर त्या नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, आता आएएस अधिकारी मीनल करनवाल या जळगाव जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) झेडपी सीईओ म्हणून रुजू झाल्या आहेत.

मीनल करनवाल या मूळच्या उत्तराखंडमधील डेहरादूनच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे सेंट जोसेफ अकदामी डेहराडून याठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज याठिकाणी झाले. यासोबतच त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात शिक्षण घेतले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी दिल्ली येथून बिझनेस एथिक्स अँड कंपनी लॉ या विषयात एलएलएमचे शिक्षण घेतले आहे.

तिसऱ्या प्रयत्नात मिळालं यश –
मीनल करनवाल यांनी आपल्या पदवीच्या शिक्षणानंतर यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र, 2016 आणि 2017 मध्ये त्यांना अपयश आले. पण 2018 मध्ये आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी आणखी कठोर परिश्रम करत यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत आयएएस सेवा मिळवली. 2018 मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 35 मिळवली. प्रचंड मेहनत आणि अभ्यास करत त्यांनी या यशाला गवसणी घातली. आता त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून रुजू होणार आहेत.

12 वर्षांनी महिला मुख्य कार्यकारी अधिकारी –
तर याआधी 16 नोव्हेंबर 2009 ते 05 जून 2012 या काळात आयएएस अधिकारी निरुपमा डांगे या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर निरुपमा डांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर 2012 मध्ये त्यांच्या जागी शितले उगले यांची नियुक्ती करण्यात आली होती. 6 जून 2012 ते 18 सप्टेंबर 2014 पर्यंत त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे शीतल उगले यांच्यानंतर आता 12 वर्षांनी जळगाव जिल्हा परिषदेला आएएस अधिकारी मीनल करनवाल यांच्या रुपाने महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्या आहेत.

हेही वाचा : राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias minal karanwaljalgaon district latest newsjalgaon zp ceomarathi newsminal karanwal jalgaon zp ceo

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page