आयएएस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणात इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने इतकी मोठी संपत्ती असताना, ओबीसीचा दाखला म्हणून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संपूर्ण चौकशी करुन शासनाला कारवाई करावाची लागेल, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. सुवर्ण खान्देश लाईव्हने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी पूजा खेडकर प्रकरणावर महत्त्वाचे भाष्य केले.