जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या परतीच्या पावसाने चांगलंच झोडपलं. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी शेतपीकांचे देखील नुकसान झालंय. तर जिल्ह्यात असलेल्या धरणांच्या जलसाठ्यांत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाच्या तापमानात वाढ झाली असून 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम असणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या परतीच्या पावसानंतर आता उन्हाच्या तापमनात वाढ झालीय. तर जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाची शक्यता कमी आहे. जळगाव जिल्ह्यात 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत 34 ते 35 तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यानंतर रात्रीच्या तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज असून पारा 15 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या मध्यानंतर थंडी वाढणार आहे.
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता –
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवसांसाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक तर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट –
पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत