• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 19, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई, 19 जून: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनच्या प्रवासाबाबत अखेर एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात खोळंबलेला नैऋत्य मोसमी पाऊस २४ आणि २५ जूनपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. यामुळे जूनच्या मध्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा मान्सूनने ८ जून रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत वेळेत एन्ट्री केली होती. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रातील मोसमी वारे कमकुवत झाले आणि बंगालच्या उपसागरात कोणतीही मजबूत प्रणाली तयार झाली नाही. परिणामी, मान्सूनची पुढची वाटचाल थांबली आणि तो रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर या पट्ट्यातच रेंगाळला. दरम्यान, मान्सूनच्या या खंडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीव्र उकाडा आणि उष्णतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आता वातावरणात पुन्हा एकदा अनुकूल बदल होत आहेत. २४ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर २५ जून ते १ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण भाग ओलांडल्यानंतर मोसमी वारे सह्याद्री पार करून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला –
मान्सून लांबल्यामुळे अनेक भागांत खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभाग आणि हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, केवळ स्थानिक पातळीवर होणाऱ्या पूर्व-मोसमी किंवा हलक्या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये. २४ ते २५ जून दरम्यान चांगला आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतर, जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच खरीप पेरण्या कराव्यात, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.

हेही वाचा: शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdmarathi newssuvarna khandesh liveweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page