ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 मार्च : महिलांचा सन्मान म्हणून जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे करण्यात आला.
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून माता-भगिनी ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, सर्व क्षेत्रात माता-भगिनी अग्रेसर आहे, असे प्रतिपादन भाजपा अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले व उपस्थित माता भगिनींचा शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका प्रतिभाताई, मदतनीस वर्षाताई, आशा वर्कर मीनाताई, महिला बचत गट सीआरपी आशा ताई, ग्रामपंचायत सदस्य रेणुकाबाई, निर्मलाताई, मीराताई, सोनी बाई व सरपंच अतुल पाटील गावातील तरुण व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
हेही वाचा : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर, वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन