अहमदाबाद, 2 जून : इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या हंगामातील क्लालिफायर -2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने 204 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यरने एमआयचा गोलंदाज अश्विनी कुमारच्या एका षटकात तीन षटकारासह 26 धावा काढून सामना पंजाबच्या बाजूने वळवला आणि मॅचमधील हाच टर्निंग पॉइंट ठरला.
पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय –
पंजाब किंग्जचा विरूद्ध मुंबई इंडियन्सचा सामन्यात सुरूवातीला पावसाचा व्यत्यय आला. दोन तासांच्या उशिराने खेळाला सुरूवात झाली. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत 203 धावा केल्या. यामध्ये जॉनी बेअरस्टो, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव तसेच नमन धीर यांनी दमदार फलंदाजी करत एमआयला 200 धावांच्या पार पोचवले.
पंजाब किंग्जचा 11 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश –
दरम्यान, पंजाब किंग्सने 200 धावांचा पाठलाग करताना आक्रमक पवित्रा घेतला. तसेच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने आठ षटकारांसह नाबाद 87 धावांची खेळी केली. अय्यरने आणि नेहाल वढेरा यांच्यात 84 धावांची भागीदारी आणि पंजाब किंग्जने ऐतिहासिक विजय मिळवत 11 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय.
हेही वाचा : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘असे’ आहे कुंभमेळाचे वेळापत्रक