संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 6 मार्च : पारोळा येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज चौक सुशोभिकरणाचा भव्य लोकापर्ण सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते काल मंगळवार 5 मार्च रोजी पार पडला. यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह शिवसनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
25 लाखांचा मिळाला होता निधी –
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातुन, आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातुन व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन पारोळा शहरातील जगद्गुरू संत श्री. तुकाराम महाराज चौकाचा सुशोभिकरणासाठी 25 लक्ष रूपयांना मंजुरी मिळाली होती.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जि.प.मा.कृषि सभापती दिनकर पाटील, नगराध्यक्ष दयाराम पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष विजु पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखाराम पाटील, मा. नगरसेवक भोमा खंडु पाटील, भिमराव जावळे, देवगांव सरपंच समीर पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रकाश नामदेव वाणी, मा. नगरसेवक संजय बुधा पाटील, हिम्मतराव सयाजी पाटील, ज्ञानेश्वर भिवसन पाटील, विक्रम दौलत पाटील, केशवआण्णा क्षत्रिय, बापु शंकर पाटील, गुलाब लालचंद पाटील, रविंद्र भोमा पाटील, रविंद्र राघो पाटील, पै. सुनिल लक्ष्मण पाटील, राजेंद्र रघुनाथ पाटील, योगेश प्रकाश पाटील, विजय पाटील(छावा), प्रशांत पाटील, प्रकाश सुपडु पाटील, लक्ष्मण शिंदे, नारायण शिंदे, सुनिल नारायण पाटील यांचेसह शेतकी संघाचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी, समस्त पाटील समाज, पारोळा, पत्रकार व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या ऐतिहासिक सोहळ्याचा यशस्वीतेसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज चौक मित्र मंडळ व श्री. शनैश्वर गृप, शनि मंदीर चौक, पारोळा या युवक मित्रांनी मोठी मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे देखील कौतुक चिमणराव पाटील तसेच त्यांचे पुत्र अमोल पाटील यांनी केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा चिटणीस रविंद्र पाटील यांनी केले तर मा.अमोलदादा पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष विजु पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्याचे सुत्रसंचलन नंदु पाटील सर यांनी केले.