जळगाव, 9 जानेवारी : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात सर्व भागात दिसून येत आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडत असताना सर्वाधिक काल बुधवारी जळगाव शहराचा पारा 8.2 अंशावर पोहचला होता. दरम्यान, राज्यात जळगाव शहरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याचे भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या संकेतस्थळाकडून सांगण्यात आले असून अजून दोन दिवस थंडी कायम राहणार आहे.
राज्यात कडाक्याची थंडी –
महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत असताना कडाक्याची थंडी पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहून थंडी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी जळगावात –
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. असे असताना राज्यात जळगाव शहरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. बुधवारी जळगाव शहरात सर्वात कमी 8.2 अंशाची नोंद करण्यात आली. तर अमरावतीमध्ये 9.8 अंश तर छत्रपती संभाजीनगरात 10 अंश तापमानाची नोंद झाली. या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, अजून दोन दिवस थंडी कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाची माहिती आहे.
जळगाव जिल्ह्याचे पुढील तीन दिवसांचे तापमान –
10 जानेवारी – कमाल तापमान – 11अंश
11 जानेवारी – कमाल तापमान – 13 अंश
12 जानेवारी – कमाल तापमान – 13 अंश
हेही वाचा : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली 5 हजारांची लाच, तलाठ्यासह दोन पंटर ताब्यात