• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पीएम-सूर्यघर योजनेत जळगावची भरारी! 100 मेगॉवटची क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

घरांच्या छतावर वीजनिर्मिती करत 27 हजार ग्राहक बनले स्वावलंबी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 5, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पीएम-सूर्यघर योजनेत जळगावची भरारी! 100 मेगॉवटची क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

जळगाव, 5 जुलै : केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जळगाव परिमंडलातील 27 हजारांहून अधिक ग्राहक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता 100.44 मेगावॅट असून शंभरी पार करणारे जळगाव हे नागपूरनंतर राज्यातील केवळ दुसरे परिमंडल ठरले आहे.

घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.

पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.

– इब्राहिम मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना मेळाव्यांद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज संबंधित ग्राहकांना दिवसा वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.


छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प उभारण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या वेबसाईटवरील अक्षय ऊर्जा पोर्टलवरही अधिक माहिती व अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

महावितरणच्या जळगाव परिमंडलात योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडलातील 27 हजार 197 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. यात जळगाव मंडलातील 16 हजार 638 ग्राहकांनी 61.81अ मेगावॅट, धुळे मंडलातील 7 हजार 212 ग्राहकांनी 26.66 मेगावॅट तर नंदूरबार मंडलातील 3 हजार 329 ग्राहकांनी 11.97 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू झालेली आहे.

हेही वाचा : पाचोरा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची केली पाहणी अन् दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmahavitaran jalgaon parimandalpm suryaghar schemesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page