• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2025
in ताज्या बातम्या, खान्देश, जळगाव जिल्हा, जळगाव शहर
Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

नवी दिल्ली, 31 जुलै : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी काल 30 जुलै रोजी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याचा मुद्दा उपस्थित केला. सुरत-भुसावळ एक्सप्रेस तसेच देवळाली-भुसावळ एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांच्या वेळेत कोविड काळानंतर बदल झालाय. मात्र, सध्यास्थितीत प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे सदर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केलीय.

खासदार स्मिता वाघ काय म्हणाल्या? –

लोकसभेत बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, माझ्या जळगाव लोकसभेतील जनतेच्या गंभीर असुविधेबाबत सभागृहाचे लक्ष वेधू इच्छिते. गाडी क्र.19005 सुरत-भुसावळ एक्सप्रेस या गाडीचे उधणा रेल्वेस्थानकावरून 11 वाजून 27 मिनिटांनी प्रस्थान होत होते आणि सकाळी 8 वाजून 45मिनिटांनी जळगाव येथे पोहचत होती. मात्र, 2019 च्या कोविडनंतर सकाळी 7 वाजता पोहचत आहे. या बदलामुळे दोंडाईचा आणि धरणगावमधील विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे गैरसोय होत आहेत. सदर गाडीने प्रवास करण्यासाठी सकाळी 3 वाजता उठून तयारी करावी लागते ज्यामुळे त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतोय.

दरम्यान, 19005 सुरत-भुसावळ एक्सप्रेस ही जर उधणा या स्थानकावरून मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी सुरू केली तर सकाळी 8 वाजून 45 मिनिटांपर्यंत ही जळगाव स्थानकावर पोहचण्याची शक्यता आहे.


देवळाली-भुसावळ एक्सप्रेसबाबत खासदार काय म्हणाल्या? –

गाडी क्र. 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी चाळीसगाव आणि पाचोरा रेल्वेस्थानकावर अनुक्रमे सकाळी 7 वाजून 40 मिनिटे,  8 वाजून 30 मिनिटे या वेळेत पोहचत होती. मात्र, आता या गाडीला दोन तासांचा उशिर होत आहे. यामुळे चाळीसगाव तसेच पाचोरा तालुक्यातील जवळपास 5 हजारांहून अधिक विद्यार्थी, महिला, नोकरदार, व्यापारी तसेच शेतकऱ्यांवर याचा परिणाम होत असून मजबुरीने त्यांना पर्यायी तसेच असुरक्षित वाहनाने प्रवास करावा लागतोय. ज्यामुळे आर्थिक तसेच सामाजिक जोखीम वाढत असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.

दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी –

सुरत-भुसावळ तसेच देवळाली-भुसावळ एक्सप्रेस ह्या दोन्ही रेल्वे गाड्या वेळपत्रकानुसार चालविल्या गेल्या पाहिजे. ज्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलासा मिळावा आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी मागणी स्मिता वाघ यांनी केली.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: indian railwayjalgaon loksabhajalgaon newsmonsoon session 2025mp smita waghsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page