• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मुक्ताईनगर

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 19, 2026
in मुक्ताईनगर, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

मुक्ताईनगर, 19 जून: मुक्ताईनगर तालुक्यातील ड्रॉप केस प्रकारांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा परिसरात जळगाव पोलिसांनी आज शुक्रवारी 19 जून रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवत संशयित आरोपींविरोधात धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ या नावाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शस्त्रे, जिवंत काडतुसे, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, वाहने तसेच वन्यजीवांचे कातडे जप्त करण्यात आले असून विविध कायद्यांअंतर्गत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना दुर्मिळ व मौल्यवान वस्तू विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सुलेमानी दगड, जुने सोने, कॉपर, शंख आदी कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ प्रसारित करून लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

आमिषाला बळी पडलेले नागरिक गावात आल्यानंतर त्यांना बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. काही प्रकरणांमध्ये विरोध करणाऱ्यांना मारहाण करून लुटल्याच्याही तक्रारी आहेत. पोलिसांच्या भाषेत या प्रकारांना ‘ड्रॉप केस’ असे संबोधले जाते.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि सुमारे २०० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त –

कारवाईदरम्यान दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, सुमारे २० लाख रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांचे चांदीचे दागिने, ३० मोबाईल फोन, चार चारचाकी व सहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. तसेच हरण, कोल्हा आणि सशाचे कातडेही हस्तगत करण्यात आले.

पोलिसांची धडक कारवाई –

कारवाईदरम्यान विविध कायद्यांअंतर्गत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. शस्त्र अधिनियमांतर्गत मधापुरी येथील फरेज राजू पवार (वय ४०) याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तर हलखेडा येथील रामजाने राईसाहेब भोसले (वय ३२) याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे तसेच बनावट नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हलखेडा येथील आक्काबाई जोगिंदर भोसले हिच्याकडून ६.४२ लाखांची रोख रक्कम, १७ मोबाईल फोन आणि मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच मधापुरी येथील रोहित सुदेश पवार याच्याकडून १४ लाखांची रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (४) अंतर्गत हलखेडा येथील राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले आणि जोगिंदर राजवंती भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गांझी दरियासिंग भोसले (रा. हलखेडा) याच्याकडून हरण, कोल्हा आणि सशाचे कातडे जप्त करण्यात आले. याशिवाय, २०२१ मधील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विलास नरविलाल पवार याला अटक करण्यात आली असून, भा.न्या.सं. कलम ३१०(२) मधील आरोपी अजय दादा पवार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हेगारीचा चिंताजनक आलेख –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत या परिसरात दरोड्याचे १०, खुनासह दरोड्याचा १, खुनाचा १, जबरी चोरीचे ७, फसवणुकीचे १६, दरोड्याच्या प्रयत्नाचा १ आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे २ गुन्हे दाखल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून भविष्यातही अशा विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsdrop case gangsjalgaon policemuktainagar drop case gangssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page