चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : सध्या जळगावहून पुणे, हैदरबाद आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावहून मुंबईला विमानाने जाता येणार आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. भारत सरकारच्या मालकीच्या अलायन्स एअर या विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जळगावहून मुंबईला विमानसेवा सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता जळगावहून मुंबईला विमानाने जाता येणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
कधीपासून सुरू होणार ही विमानसेवा –
आता जळगावहून मुंबईला विमानाने जाता येणार आहे. मुंबई-जळगाव-मुंबई फ्लाइट 20 जून 2024 रोजी गुरुवारी सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून गुरूवारी आणि शुक्रवारी ही सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती अलायन्स एअर या विमान कंपनीच्या प्रतिनिधीने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.
किती वाजता असणार विमान –
जळगावहून मुंबईला जाण्यासाठी जळगाव विमानतळावरुन विमान हे रात्री साडेआठ वाजता निघणार आहे. तर ते विमान मुंबईला रात्री पाऊणे दहा वाजता पोहोचणार आहे. म्हणजे 1 तास 15 मिनिटात जळगावहून मुंबईला पोहोचता येणार आहे. प्रवाशी जळगाव ते मुंबई विमानाचं तिकीट तुम्ही https://www.allianceair.in/ या वेबसाईटवर जाऊन बुक करू शकतात. यासाठी 3 हजार 440 रुपये विमान भाडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – Jalgaon to Pune Flight : आता जळगावहून पुण्याला विमानाने जाता येणार, आजपासून विमानसेवा सुरू, तिकीटही कमी!