• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 8, 2025
in खान्देश, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन, राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात दोंडाईचा स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा, दादर-भुसावळ विशेष गाडी नियमित करणे, नवीन भुसावळ-पुणे रेल्वे सेवा, प्लॅटफॉर्म सुविधांचा विकास, अमृत भारत स्टेशन योजनेची अंमलबजावणी आणि रेल्वे डब्यांचे अपग्रेडेशन यासारख्या मागण्यांचा समावेश आहे.

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा शहराचे औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करत सुपरफास्ट गाड्यांना दोंडाईचा स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. नाशिक आणि मध्य प्रदेशाला जोडणारा महामार्ग आणि जवळील तोरणमाळ, बाल्साना तीर्थक्षेत्रामुळे या शहराला विशेष महत्त्व आहे. सध्या सुपरफास्ट गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तसेच, 2023 मध्ये सुरू झालेली दादर-भुसावळ विशेष गाडी (09051/52, 09049/50) नियमित करावी, तिचे भाडे कमी करावे आणि एल एच बी ( LHB) कोच वापरावे, अशी विनंती रावल यांनी यावेळी केली.


दोंडाईचा स्थानकावरील प्लॅटफॉर्म 6 वर कव्हर्स्ड नसल्याने सामानाचे नुकसान होते आणि रेल्वे रॅक रिकामे करण्याच्या अनिश्चित वेळेमुळे विलंब शुल्क आकारले जाते. कव्हर्स्ड बांधणे, नऊ तासांची मर्यादा सकाळी 8 वाजता सुरू करणे आणि पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा तसेच पश्चिम खानदेशातून पुण्याला थेट रेल्वे सेवा नसल्याने भुसावळ-अमळनेर-शिंदखेडा-दोंडाईचा-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत शिंदखेडा, दोंडाईचा आणि नरडाणा स्थानकांचा समावेश करावा, तसेच काही गाड्यांचे अर्धे फर्स्ट एसी आणि सेकंड एसी कोच पूर्ण फर्स्ट एसी कोचमध्ये अपग्रेड करावे, अशी मागणीही जयकुमार रावल यांनी केली. खान्देशातील प्रवाशांच्या सोयी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी  केलेल्या मागण्यांवर रेल्वेमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

यासह, पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ashwini vaishnavjaykumar rawalmarathi newssuvarna khandesh liveunion railway minister

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page